स्तोत्रसंहिता 127
शलमोनाचे वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
1 जर परमेश्वर घर बांधीत नसेल
तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत.
जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल
तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
2 भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि
रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
देव ज्या लोकांवर प्रेम करतो
त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
3 मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत.
आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
4 तरुण माणसाची मुले सैनिकाच्या
भात्यातील बाणांसारखी आहेत.
5 जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणी\f + \fr 127:6 \fk सार्वजनिक ठिकाणी शब्दाश:“दरवाजा” याचा अर्थ एखाद्या माणसाची मुले शत्रूनी त्याला कोर्टात खेचले तर त्याचा बचाव करीत.\f* त्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.