स्तोत्रसंहिता 14
1 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
त्याला शहाणे लोक शोधायचे होते
शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
दुष्टांना देव माहीत नाही.
त्यांच्याकडे खायला\f + \fr 14:4 \fk नाश केला … खाणे हिब्रूभोषेत “नाश” केला म्हणजे “खाल्ले” असा शब्दांच्या या खेळाचा अर्थ दुष्ट लोक देवाच्या भक्तांना दु:ख देतात असा होऊ शकतो. आणि तरीही त्या दुष्टांना चांगल्या वस्तू मिळत राहातात. यामुळे लेखक गोंघळात पडतो.\f* खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
6 परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.